रामझुला उड्डाणपुलावर रात्रीची वाहतूक बंद

20 Feb 2026 20:09:17
नागपूर, 
Night traffic closed on Ramjhula flyover वाहतूक परिमंडळ सीताबर्डी व काॅटन मार्केट अंतर्गत महाराष्ट्र स्टेट राेड डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन (एमएसआरडीसी)च्या वतीने रामझुला उड्डाणपुलावर एक्स्पान्शन जाॅइंट भरणे तसेच बेअरिंग बदलण्याचे काम सुरु करणण्यात आले आहे. हे काम सलग चार दिवस, रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत करण्यात येणार आहे. निर्धारित कालावधीत जयस्तंभ चाैक ते मेयाे हाॅस्पिटल चाैक दरम्यानचा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहतूक काेंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर शहरातील सर्व वाहनचालकांनी दिलेल्या वेळेनुसार प्रवासाचे नियाेजन करावे, गैरसाेय टाळावी व वाहतूक पाेलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी केले आहे.
 
 
Ramjhula flyover
 
अशी केली वळण व्यवस्था
डीआरएम कार्यालय,रेल्वे स्थानकाकडून मेयाे हाॅस्पिटलकडे जाणारी वाहतूक डीआरएम कार्यालयापासून रेल्वे स्थानकाकडे, तेथून जयस्तंभ चाैकमार्गे गणेश टेकडी राेड, लाेखंडीपूल मार्गे, काॅटन मार्केट चाैक असा पर्यायी मार्गाने पुढे जाईल. ही अधिसूचना 20 ेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दरराेज रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लागू राहील.
 
 
रुग्णवाहिकेला असेल मुभा
मेयाे रुग्णालयासह अन्य रुग्णालयात रुग्णांना घेऊन येणाèया रुग्णवाहिकांना या रस्त्यावरुन जाण्यास मुभा असेल. वैद्यकीय कारणास्तव रुग्णवाहिका या रस्त्यावरुन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खासगी वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0