पुणे,
Anna Hotel Pune पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील शिरोळे रस्त्यावर शुक्रवारी सकाळी अण्णा हॉटेलमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजलेले नसून, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिकांनी सांगितले की, हॉटेलच्या किचन भागातून धूर येताना दिसल्याने त्वरित पोलिस व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.सध्या शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळतीमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यामुळे शिरोळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक बंद ठेवावी लागली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले.
अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझवल्यानंतर पंचनामा करून पुढील तपास सुरू केला जाणार आहे. हॉटेलमधील संपत्ती व किचन साधने यांचे नुकसान तपासल्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल.