पुण्यातील बुधवार पेठेत तस्करी रॅकेट उघडकीस

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
पुणे
Pune human trafficking, पुण्यातील रेड लाइट एरिया म्हणून ओळख असलेल्या बुधवार पेठेतील परिसर सध्या पुणे पोलिसांच्या रडारवर आला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी येथे मोठ्या प्रमाणात मानव तस्करीच्या रॅकेटवर कारवाई केली असून या प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून बाबू भैया उर्फ पापा शेख याचे नाव समोर आले आहे.
 

Pune human trafficking, Budhwar Peth, 
पोलिसांच्या तपासानुसार, थेट बांगलादेशातून महिलांना पुण्यात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेत पोलिसांनी कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते. यापैकी ११ महिला बांगलादेशी असून त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे आढळली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपासादरम्यान समोर आले की, बाबू भैया बांगलादेश सीमेवरील दलालांशी थेट संपर्कात आहे. बोगस आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दलालांच्या माध्यमातून बांगलादेशी महिलांना कोलकाता मार्गे पुण्यात आणले जात होते. महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिलाई कामाच्या आमिषाने आकर्षित करून घेण्यात येत असे, त्यानंतर जबरदस्तीने वेश्याव्यवसायात सहभागी होण्यास भाग पाडले जात असे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या प्रकरणात पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी संघटित पद्धतीने हा रॅकेट चालवत होती.
बाबू भैया उर्फ पापा शेख याची पार्श्वभूमी पाहता, सुमारे २० वर्षांपूर्वी तो बुधवार पेठेतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. काही वर्षांत त्याने या परिसरात आपले स्थान मजबूत केले आणि अवैध धंद्यांमध्ये प्रवेश करून मोठी कमाई केली. तपासात असेही समोर आले की, पापा शेख याच्या तीन बायका आहेत, ज्यांपैकी एक बांगलादेशी आहे. या तिन्ही बायकांचा बुधवार पेठेत चांगला प्रस्थ असून या महिलांना धमकवणे आणि मारहाण करून बाहेर जाण्याची परवानगी न देणे यामध्ये त्यांचा सहभाग होता.सध्या बाबू भैया पापा शेख फरार आहे आणि पोलिस त्याच्या शोधात आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून पोलिसांनी या टोळीवरील संपूर्ण तपशील उघड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.