भटक्या श्वानाचा हल्ला; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल नागरिकांत संताप

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
पुणे,
Pune stray dog attack, शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून किरकटवाडी परिसरातील चैत्रांगण सोसायटीत एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
 


Pune stray dog attack,  
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात एक चिमुरडा खेळत असताना अचानक तीन ते चार भटके कुत्रे त्याच्याकडे धावत आले. काही क्षणांतच त्यांनी मुलावर झडप घालत चावा घेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या मुलाने जोरात आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला आणि मुलाची सुटका केली.
या घटनेत मुलगा किरकोळ Pune stray dog attack,  जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने गंभीर दुखापत टळली असली तरी या प्रकारामुळे पालक आणि रहिवाशांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, किरकटवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच खेळणाऱ्या लहान मुलांना धोका निर्माण होत आहे. यापूर्वीही किरकोळ स्वरूपाच्या घटना घडल्या असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी आणि पुनर्वसनाबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच सोसायटी परिसरात नियमित गस्त आणि नियंत्रणासाठी विशेष पथक नेमण्याचीही मागणी पुढे आली आहे.दरम्यान, संबंधित विभागाकडून या घटनेची दखल घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पुढील कारवाईबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.