‘आर्ची’ रिंकू राजगुरूचा अध्यात्माकडे प्रवास

केदारनाथातील अनुभवाने बदलला दृष्टिकोन

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Rinku Rajguru, रिंकू राजगुरू हिने ‘आर्ची’ या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सैराट या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. पहिल्याच चित्रपटानंतर ती ‘वन फिल्म वंडर’ ठरेल, अशी चर्चा रंगली होती; मात्र पुढील चित्रपटांमधील सातत्यपूर्ण कामगिरीने रिंकूने अभिनयविश्वात आपले स्थान भक्कम केले. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
 

Rinku Rajguru, Sairat, 
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि अध्यात्मिक प्रवासाबाबत मोकळेपणाने संवाद साधला. पूर्वी आपण नास्तिक होतो, मात्र काही अनुभवांनंतर आपला दृष्टिकोन बदलल्याचे तिने सांगितले. विशेषतः केदारनाथ मंदिर येथे आलेल्या अनुभवाने तिच्या आयुष्यात मोठा बदल घडवला, असे ती म्हणाली.
“खरं तर आधी मी नास्तिक होते. Rinku Rajguru, पण केदारनाथला गेल्यानंतर काही अनुभव आले आणि हळूहळू विश्वास बसू लागला. त्यानंतर मी उपवास, पूजा, जप करू लागले. सण-उत्सवांमागे काही वैज्ञानिक कारणेही असतात, असे मला वाटू लागले. कुठलीतरी शक्ती आहे, याची जाणीव झाली,” असे रिंकूने स्पष्ट केले. सकाळची पूजा आणि जप यातून स्वतःला शांतता व समाधान मिळते, असेही ती म्हणाली.केदारनाथ यात्रेदरम्यानचा एक प्रसंग सांगताना रिंकू भावूक झाली. “गुरुवारी, पौर्णिमेच्या दिवशी मी चालत दर्शनाला गेले होते. खूप थकले होते. दर्शनानंतर परतीच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर मिळावे, अशी मनोमन इच्छा केली. पुढच्या दिवशी माझी फ्लाइट होती. काही तास प्रतीक्षा करूनही हेलिकॉप्टर मिळाले नाही. त्या क्षणी मी चिडले, देवावर नाराजी व्यक्त केली,” असे ती म्हणाली.रिंकू पुढे सांगते, “मी त्राग्यात पुढे निघाले. तेवढ्यात एक व्यक्ती आली आणि हेलिकॉप्टरमध्ये दोन जागा शिल्लक असल्याचे सांगितले. आनंदाने धावत गेले, पण त्याच क्षणी पडले आणि गुडघ्याला दुखापत झाली. तेव्हा मला जाणवले की तक्रार केल्याबद्दल हीच शिक्षा मिळाली. मी देवाला म्हटलं, यापुढे कधी तक्रार करणार नाही.” त्या दिवशी प्रतीक्षेत अनेक जण असूनही शेवटी फक्त आम्ही दोघी हेलिकॉप्टरने प्रवास करू शकलो, हा अनुभव विसरणे अशक्य असल्याचे तिने नमूद केले.
 
 
या अनुभवामुळे आपल्या Rinku Rajguru, आयुष्यात श्रद्धेचा अंकुर फुटला, असे रिंकूचे म्हणणे आहे. अभिनयाच्या क्षेत्रात प्रगती करत असताना वैयक्तिक आयुष्यातील या अध्यात्मिक वळणामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक नवा आयाम मिळाल्याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.