न्यू गणेश नगर बहादुरा येथे सकल हिंदू संमेलन यशस्वी

20 Feb 2026 15:14:47
नागपूर,
New Ganesh Nagar Bahadur न्यू गणेश नगर बहादुरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलन पार पडले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. हेमंत जांभेकर (विश्व हिंदू परिषद, विदर्भ प्रांत) होते. तसेच खरबीनगर संघ चालक विक्रम राम, पांगुळ महाराज (वारकरी संप्रदाय), योग शिक्षिका संदीपा मसाळकरताई व देवा धाबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कीर्तन, भजन व भारत माता पूजनाने झाली. त्यानंतर विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मुख्य वक्त्यांनी पंच परिवर्तन- स्वदेशी, नागरिक कर्तव्य, पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन - या पंच सूत्रांवर मार्गदर्शन केले. धर्म व संस्कृती टिकवण्यासाठी जातीभेद न बाळगता हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
New Ganesh Nagar
 
संयोजन उमेश बावणे, अध्यक्षत्व वासुदेव मस्के आणि सूत्र संचालन राहुल तायवाडे यांनी केले. आभार प्रदर्शन उमेश बावणे यांनी केले. New Ganesh Nagar Bahadur महाआरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक स्थानिक नागरिकांनी विशेष सहकार्य केले, ज्यात नरेंद्र नांदूरकर, बाबाभाऊ बोकडे, बालकिशोर दवणे, भूपेश बरडे, गजेंद्र चोहान, जगन मानकर, ओम शंकर पितोनिया, धनवान शाहू, भिकाम, मनोज चोपडे व रोशन वानखेडे यांचा समावेश आहे.
सौजन्य: सतीश देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0