सालेकसाचा सुपुत्र सुभेदार नेतराम कटरे शिमला येथे शहीद

20 Feb 2026 19:25:27
गोंदिया, 
Salekas' son martyred in Shimla भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेले सालेकसा तालुक्यातील पिपरिया (सुखाटोला) येथील सुपुत्र सुभेदार नेतराम हेमराज कटरे (४५) यांना शिमला येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. सलग २५ वर्षे देशसेवा करणार्‍या या वीरपुत्राच्या निधनाने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सुभेदार नेतराम कटरे यांनी सन २००० मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. सद्या त्यांची नियुक्ती हिमाचल प्रदेशातील शिमला येथून २०० किमी अंतरावर असलेल्या दुर्गम व संवेदनशील भागात होती. १९ फेब्रुवारी रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सुखाटोला गावात शोककळा पसरली आहे.
 
डफग
 
 
त्यांच्या पश्चात वृद्ध आई सरस्वताबाई, वडील हेमराज कटरे, पत्नी कविता कटरे, १२ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी असा आप्त परिवार आहे. शहीद नेतराम कटरे यांच्या पत्नी कविता कटरे या देखील महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असून सद्या त्या गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. दरम्यान, शहीद सुभेदार कटरे यांचे पार्थिव उद्या, २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी पिपरिया (सुखाटोला) येथे आणले जाणार असून राजकीय सन्मानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0