राऊतांचे मोठे विधान : राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचे गणित स्पष्ट

उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाण्याच्या मार्गावर

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Sanjay Raut राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकाच जागेवर कोणाचा शिक्कामोर्तब होणार याची चर्चा सध्या जोरात आहे. महाराष्ट्रासाठी ७ जागा उपलब्ध असून त्यातील एक जागा महाविकास आघाडीकडे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणाला पाठवायचे, यावर तीनही पक्षांतर्गत चर्चासत्र सुरु आहे.
 

Sanjay Raut 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत गणित स्पष्ट करत म्हटले की विधानपरिषदेवर उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात कोणतीही अडचण नाही. त्यानुसार, राज्यसभेसाठी आवश्यक ३७ मतांसाठी महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार केला असता, उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेमधून पाठवणे शक्य आहे.संजय राऊत म्हणाले की, “आधी निर्णय ठरवा. महाविकास आघाडीची फक्त एक जागा आहे. आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि अस्मितेसाठी योग्य व्यक्तिमत्व कोणते आहे, हे तीन पक्ष बसून ठरवतील. निर्णय एकमतानं होणार आहे. आदित्य ठाकरे जे बोलले ते योग्य आहे. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेनुसार अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आताच बोलणे निरर्थक आहे.”
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतून निर्णय घेण्याची स्वतंत्र क्षमता असून काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून येतो, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी कोण कुर्बानी देतो त्याला विधान परिषदेची जागा मिळणार आहे; काँग्रेसची विधान परिषदेची आमदार पाठवण्याची इच्छा असल्याने उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेवर जाणे थोडे कठीण वाटत असले तरी संख्याबळानुसार ते शक्य आहे, असे राऊत यांनी सांगितले.सध्या शिवसेनेकडे २०, काँग्रेसकडे १६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० आणि इतर घटक पक्षांमुळे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे ५० मतांच्या घरात आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी आवश्यक ३७ मतांचा पुरेसा आधार आहे. “सर्वांचीच इच्छा आहे की उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जावेत. लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.