आतापर्यंत सहा अपत्ये; सीमा हैदर पुन्हा देणार बाळाला जन्म?

20 Feb 2026 14:00:27
ग्रेटर नोएडा,
seema-haider पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सहा मुलांची आई असलेल्या सीमाने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी तिने सचिन मीणा पासून मुलीला जन्म दिला होता, तर आता ती पुन्हा आई झाली आहे. एका वर्षात दोन अपत्यांना जन्म दिल्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकाही होत आहे, तर काही जण हे तिचे वैयक्तिक आयुष्य असल्याचे सांगत तिचे समर्थन करत आहेत. मात्र सीमा आणि सचिन यांनी आता कुटुंब वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
seema-haider
 
नवजात मुलाच्या नामकरणाची आणि पारंपरिक विधींची तयारी सुरू असताना दोघांनी एका व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली. घरात आलेल्या पुजाऱ्याशी बोलताना सचिनने सांगितले की, मागील वेळी मुलीच्या नामकरणावेळी पुजाऱ्यांनी सीमाला आशीर्वाद म्हणून सफरचंद देत पुढील वेळी मुलगा होईल असे भाकीत केले होते आणि ते खरे ठरले. यावेळी मात्र त्यांनी पुन्हा तसे आशीर्वाद देऊ नयेत, अशी विनंतीही केली. सीमानेही सहा मुले पुरेशी असल्याचे सांगत आता आणखी अपत्य नको असल्याचे स्पष्ट केले. आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावे, हीच देवाकडे प्रार्थना असल्याचे तिने म्हटले. सीमा हैदरची कहाणी २०२३ मध्ये समोर आली होती. ऑनलाइन गेम खेळताना तिची ओळख ग्रेटर नोएडातील सचिन मीणाशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. seema-haider जुलै २०२३ मध्ये ही बाब उघड झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर सीमा सचिनसोबत राहत असून त्यांनी विवाहही केला आहे. या दाम्पत्याला आता दोन मुले झाली आहेत.
सीमा स्वतःला आता हिंदू आणि भारतीय म्हणून ओळख देते. तरीही तिला अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. नागरिकत्वासाठी केलेली तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेली चर्चा मात्र अद्याप थांबलेली नाही.
Powered By Sangraha 9.0