श्रीगुरुदेव सेवामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात

20 Feb 2026 18:11:35
नागपूर,
Shri Gurudev Sevamandal श्रीगुरुदेव सेवामंडळ, जानकीनगर शाखेतर्फे हनुमान मंदिर येथे शिवजयंती अर्थात “बलोत्कर्ष दिन” विविध सामाजिक, बौद्धिक व सामान्यज्ञान स्पर्धांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. डॉ. किरण भुयार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श गुणांचे अनुकरण तरुणांनी करावे, असे प्रतिपादन केले. प्रारंभी प्रतिमापूजन व सामुदायिक ध्यान झाले. त्यानंतर प्रभातफेरी काढण्यात आली.

non  
 
 
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.Shri Gurudev Sevamandal कार्यक्रमाचे संचालन प्रियांका मगरदे व नीलिमा तोडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप गाडगे यांनी केले. विविध शाखांतील गुरुदेवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. शांतीदास लुंगे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0