महिला शेतकर्‍यांसाठी कार्य करणार्‍या सृष्टीची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप

20 Feb 2026 15:29:24
हिंगणघाट,
srusti selection for harvard university ग्रामीण विद्यार्थ्यांची जिद्द, योग्य संधी मिळाली की यश निश्चित मिळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सृष्टी या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने घेतलेली उत्तुंग झेप आहे. येथील ज्ञानदा विद्यालयातील विद्यार्थिनी असून या विद्यालयानेच तिला उच्च शिक्षणासाठी पुण्यात पाठवले होते. योग्य मार्गदर्शन, संधी आणि पाठबळ मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये किती प्रचंड क्षमता असते, याचे सुंदर उदाहरण सृष्टीने दाखवून दिले आहे.
 

हार्वर्ड युनिव्हर्सिटी  
 
महिला शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्य विषयावर काम करणारी सृष्टी दुष्यंत डोईजड हिची प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठाच्या वर्ल्ड लीडरशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. धोरणनिर्मिती व संशोधन क्षेत्रात कार्य करणार्‍या जागतिक स्तरावरील युवा प्रतिनिधींमधून तिची निवड करण्यात आली असून, यावर्षी राज्यातून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. सृष्टीने इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण सन २०२१ ते २०२३ या कालावधीत येथील ज्ञानदा कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. ग्रामीण पृष्ठभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सृष्टीला लहानपणापासून शेती आणि शेतकर्‍यांच्या समस्या जवळून पाहण्याची संधी मिळाली.
 
महिलांच्या मानसिक ताणतणावाच्या प्रश्नांची जाणीव झाल्यानंतर तिने सखी हा उपक्रम सुरू करून शेतकरी महिलांच्या भावनिक व मानसिक आरोग्यासाठी काम सुरू केले. तिच्या या उपक्रमाची दखल घेऊन राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या कृतीदलात तिची विशेष सदस्य म्हणून निवड केली आहे. ज्ञानदा विद्यालयात विद्यार्थी बारावीपर्यंत शिक्षण घेतात; पण पुढे मोठ्या शहरात शिक्षणासाठी आर्थिक आणि निवासाच्या अडचणी उभ्या राहतात. अशावेळी विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे यांनी सृष्टी डोईजड हिची राहण्याची व जेवणाची सोय करून दिली.srusti selection for harvard university आणि तिच्या स्वप्नांना दिशा मिळाली. गेल्या काही वर्षांत या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी पुण्यात उच्च शिक्षण घेत असून स्वतःचे भविष्य घडवत आहेत. सृष्टीच्या यशात आई रजनी, वडील दुष्यंत डोईजड यांचे प्रोत्साहन आणि ज्ञानदा विद्यालयातील लकी खिलोसिया, शशांक सराफ, चेतना लाटकर यांनी केलेल्या सहकार्यातून हे यश संपादन केल्याची भावना सृष्टीने व्यत केली आहे.
Powered By Sangraha 9.0