सुपर-८ मध्ये भारताची खरी कसोटी!

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
The real test of India टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात गट टप्प्यात सर्व सामने जिंकत सुपर-८ फेरीत प्रवेश केला आहे. गतविजेता म्हणून आता भारताला बलाढ्य संघांविरुद्ध खरी कसोटी पार पाडावी लागणार आहे. सुपर-८ मध्ये भारतासमोर २०२४ चा उपविजेता दक्षिण आफ्रिका, तसेच वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ येणार आहेत. आतापर्यंत भारताची कामगिरी जबरदस्त असली तरी काही उणिवाही स्पष्ट झाल्या आहेत. सुपर-८पूर्वी त्या दुरुस्त केल्या नाहीत तर उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होऊ शकतो. माजी फिरकीपटू आर. अश्विनने भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही संघाने कोणतीही कमतरता दाखवली नाही, असे त्यांनी नमूद केले.
 

ar ashwin 
सूर्यकुमार यादवने संयमाने डाव सांभाळला, तर शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी योग्य वेळी धावगती वाढवण्याची जबाबदारी पेलली. अश्विनच्या मते, भारत आपला सर्वोत्तम फॉर्म पकडल्यास त्याला हरवणे प्रतिस्पर्ध्यांसाठी खूप कठीण ठरते. आर. अश्विनने तिलक वर्माच्या फलंदाजीवरही भाष्य केले. दुखापतीनंतर पुनरागमन करताना त्याच्यासाठी ताकदपेक्षा योग्य टायमिंग आणि प्लेसमेंट अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की टी-२०मध्ये बऱ्याचदा फक्त मोठे फटके आणि ताकद यावर भर दिला जातो, पण बॅटच्या स्वीट स्पॉटवर चेंडू लागणे आणि योग्य टायमिंग हे फलंदाजीचे मूळ तत्त्व आहे.
 
 
 
तिलक मोठा पॉवर-हिटर नसल्यामुळे त्याच्यासाठी योग्य टायमिंग साधणे आणि गॅप शोधणे महत्त्वाचे आहे. वैभव सूर्यवंशीसारखे आक्रमक खेळ करता येतो, पण तिलकसारखी टायमिंगवर आधारित फलंदाजीही तितकीच प्रभावी ठरते, असे अश्विन यांनी सांगितले. सुपर-८ मध्ये भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळला जाईल. या फेरीतील अखेरचा सामना १ मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार आहे.