विलीनीकरणानंतर पवार घेणार होते मोठा निर्णय... राजकारणात 'भूकंप'

21 Feb 2026 15:42:04
मुंबई,
Sharad Pawar अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात विविध दावे-प्रतिदावे होत असून, दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या तयारीबाबत मोठ्या गोपनीयतेत चर्चा झाली होती.
 

Ajit Pawar Demise Sparks NCP Merger Talks; Sharad Pawar to Step Back from Politics 
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याआधी मोठा दावा केला होता की, विलीनीकरणानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद अमोल कोल्हे यांच्याकडे जाईल आणि ही इच्छा अजित पवारांची देखील होती. तसेच, शरद पवार यांनी देखील विलीनीकरणाबाबत गौप्यस्फोट करत 12 तारखेला या निर्णयाची घोषणा होणार होती, असे सांगितले.
या पार्श्वभूमीवर Sharad Pawar अमोल कोल्हे यांनीही मीडिया समोर मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, विलीनीकरणानंतर मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसी कॉलम नसल्याचेही नमूद केले आणि असा अभ्यासू नेता वरिष्ठ सभागृहात असायला हवा, असा विचार अजितदादांबरोबर चर्चा दरम्यान त्यांनी व्यक्त केला होता.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणानंतर शरद पवार राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यात सक्रिय राहणार आहेत, तर पक्षाची सर्व जबाबदारी अजित पवारांकडे येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत असतानाही अजितदादांची इच्छा होती की ते पुन्हा राज्यसभेवर जावेत.राजकीय वर्तुळात या विलीनीकरणाच्या चर्चेने मोठी गती पकडली असून, पक्षाच्या भविष्यासाठी या निर्णयाचे परिणाम कसे होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0