आर्वी नायावरील पोलिस चौकी ठरली आडोश्याची मुतारी

21 Feb 2026 20:20:54
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Arvi Naka Wardha police chowki वर्धेतील वाहतूक व्यवस्थेच्या नावाने कायम बोंब आहे. अतिक्रमणाने रस्ते आकुंचित झालेले आहेत. चौका चौकात असलेले वाहतूक पोलिस निरीक्षक फत चालानसाठी सावज शोधूत सावधपणे उभे असतात. आर्वी नाका पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात गेला असताना कोरोना काळात या ठिकाणी लावलेल्या छोट्या पोलिस चौकीच्या आडोशाला आता दिवसा लघुशंका आणि रात्री त्याच चौकीत भाजीपाला ठेवण्यात येत असल्याचे फिरता फिरता कळले.
 
 
 
वर्धा,
 
वर्धा शहरातील आर्वी नायावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलिस चौकी सध्या स्वतःच असुरक्षित आणि उपेक्षित अवस्थेत दिसत आहे. मध्यवस्तीत, चारही बाजूंनी सतत वाहतुकीचा राबता असलेल्या आर्वी नाका चौकात म्हाडा कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर सिग्नलच्या खाली उभी असलेली ही ‘स्मॉल पोलिस चौकी’ गेल्या काही वर्षापासून बंद आहे. पोलिस बंदोबस्तासाठी असलेली ही जागा आता नागरिकांच्या गैरसोयीचे आणि अस्वच्छतेचे केंद्र झाली आहे. चौकीच्या आडोशाला अक्षरशः भरदिवसा लघुशंका उरकवली जात आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. याच ठिकाणी बाजूलाच भाजीविक्रेते बसतात. हे किरकोळ भाजी विक्रते रात्री त्याच पोलिस चौकीत साहित्य ठेवत असल्याचे फोटोही तरुण भारतच्या हाती लागले आहेत. लघुशंका आणि भाजीचे साहित्य एकाच ठिकाणी ठेवल्या जात असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला अन्नपदार्थांची विक्री आणि दुसर्‍या बाजूला अस्वच्छता या विसंगतीमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यत केला आहे. ही चौकी ज्या ठिकाणी आहे त्या भागात दोन्ही बाजूंनी दुकाने, सततची वाहनांची वर्दळ, तसेच याच मार्गाने शाळा आणि महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी दररोज ये-जा करतात.
 
 
 
आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थीही याच मार्गाने जातात. शहरातील सर्वाधिक संवेदनशील चौक म्हणून आर्वी नायाची ओळख आहे. त्या ठिकाणी वाहतूक पोलिस निरीक्षक सकाळपासुन निगराणीत असतात. त्याच ठिकाणची स्मॉल पोलिस चौकी बंद आहे. आता चौकीला कायम कुलूप असल्याने लघुशंका उरकवली जात असल्याने आमच्या सारख्याअ अनेक दुकानदारांना त्रास सहन करावा लागतो, अशी माहिती दूध आणि दुग्ध पदार्थ विक्रेते राहुल शहाळे यांनी दिली. या संदर्भात आम्ही नगर पालिका, पोलिस स्टेशन आणि तत्कालीन आमदार विद्यमान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनाही निवेदन दिले. परंतु, आर्वी नायाच्या सौंदर्याला बाधा पोहचणारी ती स्मॉल पोलिस चौकी अद्याप उचलण्यात आली नाही. त्या चौकीत पोलिस बसुन चौकाची सुरक्षा करणार असतील तर आमचा त्याला विरोध नाही. परंतु, ती चौकी बंद असल्याने त्याच्या आड आज लघुशंका झाली भविष्यात दारू पिण्यासाठी आडोसा म्हणून उपयोग झाल्यास त्याला कारणीभूत कोण असा सवाल आर्वी नाका परिसरातील नाकरिकांनी उपस्थित केला. आर्वी नाका दारूविक्री आणि झोपडपट्टीनेही तसाच कुप्रसिद्ध झाला असताना त्यात अजून एक भर पडली आहे. ‘सुरक्षेसाठी उभारलेली चौकीच जर बंद असेल, तर तिचा उपयोग काय?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी बजाज चौकातील मुडके बुक स्टॉल पुढेही अशीच एक चौकी होती त्यातही भाजीपाला ठेवला जात होता. या चौकी संदर्भातील ‘तरुण भारत’ने प्रश्न उपस्थित केल्यानंतर ती उचलण्यात आली. आर्वी नायावर सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलिस निरीक्षक कर्तव्य बजावत उभे असतात. थोडेफार थकल्यास किंवा पाऊस आल्यास आजूबाजूला कुठेतरी ते सहारा घेतात. परंतु, बंद असलेल्या पोलिस चौकीकडे पोलिस विभागाचे ध्यान नसल्याचे दिसून येते आहे. शहरातील सिग्नल बंद, कधी कधी काही काही तासासाठी सुरू होतात. बोरगाव आणि गोल बाजारातील पोलिस चौकी कुलूप बंद आणि आता पोलिस चौकीच्या आडोशाला लघुशंका!
Powered By Sangraha 9.0