केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आयुष विभागाची नियोजन बैठक

21 Feb 2026 20:31:41
बुलढाणा,
Central AYUSH Minister Prataprao Jadhav, आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य मेळावा शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये आयुष क्षेत्रात काम व्यक्तींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले
 

Central AYUSH Minister Prataprao Jadhav, 
२५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विसावा मैदान आनंदसागर रोड येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आल आहे या मेळाव्याचे उद्घाटन माननीय राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयुष आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीची बैठक २१ फेब्रुवारीला शेगाव येथे घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करताना केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते यावेळी व्यासपीठावर शेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाचे उपाध्यक्ष वैद्य आशुतोष गुप्ता नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठआयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता वैद्य मिलिंद आवारे आयुर्वेद असोशिएशन चे उपाध्यक्ष वैद्य दत्ता पाटील वैद्य रामदास अवाड, राजेश्वर उबरहंडे यांच्यासह आयुष अंतर्गत येणारे आयुर्वेद योगा युनानी सिद्ध होमिओपॅथी चिकित्सा पद्धती अंतर्गत काम करणारे व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी मार्गदर्शन करताना आ. संजय कुटे म्हणाले की घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा उपयोग सर्व सामान्य व्यक्तींनी केल्यास निरोगी आयुष्यासाठी त्यांना मोठा हातभार लावू शकतो त्यासाठी आजीबाईचा बटवा घरोघरी पोहोचवण्याचं कारण आयुष क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींनी पोहोचण्याच आवाहन आमदार कुटे यांनी केले तर पारंपारिक भारतीय आयुर्वेदाचा प्रचार प्रसार ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये होणे गरजेचे आहे निरोगी आयुष्यासाठी आयुष चिकित्सा पद्धती महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून सर्वसामान्य व्यक्तींना मोफत आयुष अंतर्गत उपचार आणि माहिती देण्यासाठी हे राष्ट्रीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरातचा लाभ सर्वांनीच घ्यावा अस आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले या नियोजन बैठकीला राज्यातील आयुष अंतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0