आज विविध वस्त्यांमध्ये हिंदूू संमेलने

21 Feb 2026 11:13:36
नागपूर,
hindu sanmelan रा.स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त महानगरातील वस्त्यांमध्ये हिंदू समाजात जागरण करण्याच्या उद्देशाने नवीन ऊर्जा व चेतना प्रदान करण्यासाठी रविवारी 22 फेब्रुवारीला हिंदू संमलने होणार असून या अंतर्गत स्पर्धार्, प्रभात फेरी आदी विविधांगी कार्यक्रम सुरू आहेत.
 
 
 
सकल हिंदू संमेलन
 
जयप्रकाशनगरातील श्रीराम-हनुमान मंदिरापासून आज शनिवारी 21 तारखेला सायंकाळी 5 वाजता स्कूटर रॅली निघेल. गोविंदनगर, तपोवन, राहुलनगर, नरकेसरी व धरमपेठ ले-आऊट या मार्गाने महालक्ष्मी मंदिरात समारोप होईल. श्रीराम-हनुमान मंदिर पटांगणात रविवारी सायंकाळी 6 वाजता हिंदू संमेलन होणार आहे. प्रचिती धोंड यांचे झाशी राणी लक्ष्मीबाई विषयावर कीर्तन, धापेवाडा रघुनाथ स्वामी मठाधिपती यशवंत महाराज पराते, राष्ट्रसेविका समितीच्या अ.भा. सहबौद्धिक प्रमुख डॉ. लीना गहाणे यांचे ‘महिला सुरक्षा, पंचपरिवर्तन’ विषयावर उद्बोधन होईल.
 
पांडे ले-आऊट
पांडे ले-आऊट, स्नेहनगर, मालवीयनगर, खेता ले-आऊट आदी वस्त्यांमध्ये आज शनिवारी 21 तारखेला सायंकाळी 5.30 वाजताा बाईक रॅली निघेल. रविवारी 22 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता रांगोळी, दुपाारी 4 वाजता लहान मुलांसाठी चित्रकला, वेशभूषा स्पर्धा होतील. पांडे ले-आऊट पाण्याची टाकी मैदानात सायंकाळी 5 वाजता गोपूजन, भजन, दीप प्रज्वलनाने हिंदू संमेलनास प्रारंभ होईल. सायंकाळी 6.30 वाजता डीएमएमसी व एसएम हॉस्पिटल व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनूप मरार यांचे उद््बोधन होईल. रा.स्व. संघाचे महानगर सहकार्यवाह उदय वानखेडे प्रमुख वक्ते रहातील.
त्रिकोणी पार्क, धरमपेठ
गिरीपेठ-धरमपेठ वस्तीचे हिंदू संमेलन धरमपेठेतील त्रिकोणी पार्कमध्ये रविवारी 22 तारखेला सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र धर्मप्रसार प्रमुख प्रा. अजय निलदावार, प्रसिद्ध बल्लवाचार्य विष्णू मनोहर प्रमुख पाहुणे रहातील.
रामभाऊ म्हाळगीनगर
रामभाऊ म्हाळगीनगर, महात्मा गांधीनगर परिसरातील वस्तीचे हिंदू संमेलन रविवारी 22 फेब्रुवारीला हुडकेश्वर मार्गावरील राधाकृष्ण मंदिरामागील अष्टविनायक कॉलनीतल्या गणेश मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.hindu sanmelan सकाळी 8 वाजता गणेश व गोपूजन, गायत्री यज्ञ, दुपारी 3.30 वाजता हिंदू जागर यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. हिंदू संमेलन सायंकाळी 5.45 वाजता जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांंच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
Powered By Sangraha 9.0