कारंजा मंडलाचे सकल हिंदू संमेलन

21 Feb 2026 20:29:18
कारंजा (घा.),
Karanja Hindu Mahasabha राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशाल हिंदू संमेलन व संत दर्शन सोहळा सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुकुल पब्लिक स्कूलसमोरील मैदानावर रविवार २२ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
 

Karanja Hindu Mahasabha 
हिंदू संमेलनांची योजना राबविण्यात येत असून, त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कारंजा मंडळातील ११ गावांचा हा संयुत सोहळा साजरा होत आहे. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ९ वाजता गायत्री महायज्ञाने होणार आहे. दुपारी २ वाजता कलश यात्रा, शोभायात्रा व पारंपरिक पालखी सोहळा शहरातून मार्गक्रमण करणार आहे. सायंकाळी ४ वाजता संत दर्शन सोहळा व हिंदू संमेलन होईल.यावेळी प्रमुख वते म्हणून रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे उपस्थित राहणार असून श्यामनारायणदास महाराज व साध्वी रामप्रिया माई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी संत सखु माता, संत सयाजी महाराज, भन्ते रतनज्योती महाराज, संत ज्ञानेश्वर पवार महाराज, राजयोगिनी उमादेवी व महंत माधेराज महाराज यासह अनेक संत-महात्म्यांची उपस्थिती राहणार आहे.
शहर व परिसरातील माता-भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत कलश यात्रा व महायज्ञात सहभागी व्हावे तसेच सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू एकतेचा विराट संदेश द्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
Powered By Sangraha 9.0