बारावीच्या दाेन विषयांचे पेपर फुटले

21 Feb 2026 14:00:52
अनिल कांबळे
नागपूर,
xii leaked papers राज्यात पेपरफुटीच्या घटना दिवसेंदिवस उघडकीस येत असून यावर्षीसुद्धा नागपुरातील सदरमधील सेंट ऊर्सूला शाळेतील परीक्षा केंद्रावर बारावी बाेर्डाचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला. या प्रकरणी सदर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून दाेन विद्यार्थिनींची चाैकशी केली आहे. चाैकशीत फिजिक्स विषयासुद्धा पेपर अशाच प्रकारे फुटल्याचा हा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
 
 
 
paper leack
 
 
राज्यात याआधी पेपर फुटीचे अनेक प्रकरणे समाेर आली आहेत. आता, थेट बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समाेर आल्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. गुरुवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला हाेता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या माेबाइलवर व्हाॅट्सअप ग्रूपवर आला हाेता. सदर परीसरातील सेंट ऊर्सूला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले. एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात हाेती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाला संशय आला. ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा बाहेर गेल्यानंतर परत आली असता तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली. तिच्याकडून एक स्मार्ट फोन जप्त करण्यात आला. ताे माेबाईल तपासला असता त्यामध्ये एका व्हाॅट्सअप ग्रूपवर परीक्षा सुरु हाेण्यापूर्वीच पेपर आलेला हाेता. तसेच त्याच ग्रूपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली हाेती. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी सदर पाेलिसांना फोन केला. सदरचे ठाणेदार अमाेल देशमुख हे पथकासह परीक्षा केंद्रावर पाेहचले.
15 विद्यार्थ्यांचा व्हाॅट्सअप ग्रूप
माेबाईल तपासला असता व्हाॅट्सअपवर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रूप तयार करण्यात आला हाेता. त्यामध्ये सेंट ऊर्सूला परीक्षा केंद्रावरील 2 विद्यार्थिनी सहभागी हाेत्या. दाेन्ही विद्यार्थिनींची चाैकशी केली असता त्यांनी खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली.xii leaked papers अन्य 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर केमिस्ट्रीचा पेपर माेबाईलवरील माहितीवरुन साेडवत हाेते. त्या विद्यार्थ्यांचा शाेध सुरु आहे.
पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल
विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरुन आणि व्हाॅट्सअप ग्रूपमधील माहितीवरुन सदर पाेलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा पेपर आतापर्यंत किती जणांपर्यंत पाेहचला तसेच या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत याची माहिती पाेलिस घेत आहेत. या पेपर फुटीप्रकरणा कुणीतरी शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.

सेंट ऊर्सूला परीक्षा केंद्रावर केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयाच्या पेपर फुटीचे प्रकरण समाेर असून गुन्हा दाखल करण्यात आला. ट्युशन क्लासेसच्या शिक्षकांनी हा पेपर फोडला आणि परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचवला. तपासात माेठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रावर सापडलेल्या दाेन्ही विद्यार्थिंनींची चाैकशी करण्यात आली असून अन्य 13 विद्यार्थ्यांचा शाेध घेऊन चाैकशी करण्यात येणार आहे.
- अमाेल देशमुख (वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सदर पाेलिस ठाणे)
Powered By Sangraha 9.0