"जागतिक सामाजिक न्याय दिवस" उत्साहात साजरा

21 Feb 2026 12:16:33
सावनेर(नागपूर)
World Day of Social Justice दिनांक २० फेब्रुवारीला दिवाणी व फौजदारी न्यायालय, सावनेर येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने "जागतिक सामाजिक न्याय दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. ए. सरदार, होते. त्यांनी आपल्या भाषणात समाजातील शोषित, पीडित, गरीब व गरजू घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. मंचावर तृतीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एम. गाडे, उपस्थित होत्या
 

din 
 
 
कार्यक्रमास न्यायाधीश, अधिवक्ता, कर्मचारीवृंद तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते . ए. जे. मुलमुले आणि . (अधिवक्ता, दिवाणी न्यायालय, सावनेर) बी. आर. सोनकुसरे यांनी सामाजिक न्यायाचे महत्त्व स्पष्ट केले.World Day of Social Justice प्रमुख पाहुणे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पी. पी. ठाकुर, यांनीही मार्गदर्शन केले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (अध्यक्ष, तालुका अधिवक्ता संघ, सावनेर)एस. पी. जैन यांनी केले, तर आभार प्रदर्शन एम. सी. खंगारे यांनी केले.
सौजन्य:अनिल सोलंकी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0