छ.संभाजीनगरमध्ये पोलिस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

21 Feb 2026 14:26:33

police recruitment
 
 
छ.संभाजीनगर,
Youth dies during police recruitment शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणीदरम्यान दोन तरुणांचा मृत्यू, परिसरात हळहळ छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना दोन दुर्दैवी घटना समोर आल्या. लोहमार्ग पोलिस पदासाठी आयोजित शारीरिक चाचणीदरम्यान सांगली जिल्ह्याचा २३ वर्षीय संग्राम शिंदे धावण्याच्या सरावात अचानक कोसळला. उपस्थित पोलिसांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपास केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.  संग्राम धोंडीराम शिंदे या तरुणाचा मृत्यू सकाळी ८.१५ वाजता १६०० मीटर धावताना चक्कर येऊन झाला. या घटनेमुळे भरती प्रक्रियेत असलेल्या इतर उमेदवारांमध्ये शोककळा पसरली असून, संग्रामच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Powered By Sangraha 9.0