आजनसरा येथे आज आरोग्य शिबिर

22 Feb 2026 19:39:18
*ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान व संत भोजाजी महाराज देवस्थानचा सहभाग
आजनसरा, 
Ajansara : Health camp ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर, संत भोजाजी महाराज देवस्थान व ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान आजनसरा यांच्या संयुत वतीने सोमवार २३ रोजी संत भोजाजी महाराज देवस्थान सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉटरांची चमू उपलब्ध राहणार असून शिबिरात मेडिसिन तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, किडनी, मेंदू रोग, बाल रोग, सर्जरी, नेत्ररोग, स्त्री रोग, कान नाक घसा, अस्थि रोग, त्वचा रोग व मुखरोग तज्ज्ञ डॉटर सहभागी होणार आहेत. शिबिरात येणार्‍या मधुमेह व रतदाबाच्या रुग्णांना मोफत औषधी दिल्या जाणार आहे.
 
 
helth
 
Ajansara : Health camp  तसेच ज्या रुग्णाला अधिकच्या तपासण्या करणे गरजेच्या असल्यास सर्व तपासण्या व शिबिर स्थळावरून शालिनीताई मेघे हॉस्पिटल हिंगणा येथे जाण्याकरिता वाहनाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. दारोडा, वडनेर, कात्री कान्होली, मनसावळी, शिरसगाव, निधा टाकळी येथील रुग्णांना येण्यासाठी बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्ता मेघे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी डॉ. राजू मिश्रा राहतील तर विशेष अतिथी म्हणून आ. समीर कुणावार, प्रमुख अतिथी आ. राजेश बकाने उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्येेष्ठ नागरिक प्रतिष्ठान हिंगणघाट-समुद्रपूर तालुका संयोजक डॉ. विजय पर्बत यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0