वर्धा,
आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १०२ च्या Ambulance drivers' strike रुग्णवाहिका चालकांनी सोमवार २३ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची पूर्व कल्पना जिल्हा आरोग्य अधिकार्यांना निवेदन सादर करून देण्यात आली आहे.
Ambulance drivers' strike जिल्ह्यात १०२ च्या ६४ रुग्णवाहिका आहेत. गंभीर आजारी, अपघातग्रस्त, बाळंतीन माता आदी रुग्णांना या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. कोरोना काळात रुग्णवाहिका चालकांनी स्वत:च्या कुटुंबाला दुय्यम स्थान देत प्रत्येक कोविड बाधिताला वेळीच उपचार मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले. पण सध्या त्यांच्याच विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राज्यातील १०२ च्या रुग्णवाहिका चालकांनी आंदोलनाचा निर्धार केला आहे. रविवार २२ फेब्रुवारीपर्यंत मागण्यांवर तोडगा काढा अन्यता सोमवार २३ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित विषयी शासन व प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पर्यायी व्यवस्था
सोमवार २३ फेब्रुवारीपासून १०२ च्या रुग्णवाहिकांवरील चालकांनी आंदोलनावर ठाम राहत कामबंद आंदोलन सुरू केल्यास या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास ५८ चालक सहभागी होण्याची शयता आहे. त्यामुळे जिल्ह्यात धावणार्या १०२ च्या रुग्णवाहिका थांबू नये यासाठी आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.