युद्धाच्या चर्चेत इराणमध्ये नवे समीकरण; खामेनींनी या व्यक्तीला सोपवले त्यांचे अधिकार

22 Feb 2026 16:52:43
तेहरान, 
khamenei-nsa-ali-larijani अमेरिकेशी संभाव्य संघर्षाच्या चर्चा तीव्र होत असताना इराणने तातडीने सत्ताकारणात मोठे बदल केले असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील प्रमुख दैनिकने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी राष्ट्रीय सुरक्षेची सर्व महत्त्वाची सूत्रे आपल्या सल्लागार अली लारीजानी यांच्या हाती सोपवली आहेत. अमेरिका आणि इस्रायलसोबत संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
khamenei-nsa-ali-larijani
 
या निर्णयानंतर लारीजानी यांची भूमिका अधिक प्रभावी बनली असून सुरक्षा, लष्करी तसेच कूटनीतिक कारवायांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भूमिका मर्यादित झाल्याची चर्चा आहे. खामेनेई यांनी संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीसाठी बहुपदरी उत्तराधिकार आराखडाही तयार ठेवण्याचे निर्देश दिल्याचे समजते, जेणेकरून कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास सत्तेचा कारभार खंडित होऊ नये. दरम्यान, इराणने आपल्या लष्कराला उच्च सतर्कतेवर ठेवले असून क्षेपणास्त्र यंत्रणा धोरणात्मक ठिकाणी हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. विविध लष्करी सराव वेगाने पार पाडले जात असून अंतर्गत सुरक्षादलांनाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात लष्करी हालचाली वाढविण्यात आल्या आहेत. khamenei-nsa-ali-larijani या भागात अलीकडेच क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
सध्या लारीजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. khamenei-nsa-ali-larijani अणु चर्चांपासून ते प्रादेशिक सहयोगी देशांशी संपर्क राखणे, तसेच संभाव्य युद्धकालीन आराखड्यांचे नियोजन करणे अशी विविध जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत. एकूणच, संभाव्य अमेरिकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणने प्रशासन आणि सुरक्षाव्यवस्थेत मोठी पुनर्रचना करून कोणत्याही परिस्थितीत शासनाची सलगता टिकवून ठेवण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0