डिसेंबर महिन्यात विकलेले दुसरे बाळही पोलिसांच्या ताब्यात

22 Feb 2026 15:19:34
भंडारा,
baby selling case Bhandara, बाळ विक्री प्रकरणात आरोपींच्या अटकेसह नवनवीन गोष्टी आता पुढे येत आहेत. 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा बालकल्याण समिती व भंडारा पोलिसांनी रात्री उशीरा डिसेंबर महिन्यात विक्री केले गेलेले बाळ ताब्यात घेतले आहे. याही प्रकरणात मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी असल्याने याची पाळीमुळे आणखी किती खोल गेलीत हे तपासात पुढे येणार आहे. विशेष म्हणजे या बाळाचा सौदा 4 लाख 70 हजार रुपयात झाला होता असे समजते. सध्या ताब्यात घेतलेले बाळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहे.
 

baby selling case Bhandara, 
उपचाराच्या नावाखाली बाळाची विक्री करण्याचा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एक एक गोष्टी उलगडत गेल्या. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नितेश बाजपेयी असल्याचे उघड झाल्याने त्यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हे दाखल झाले होते. आत्तापर्यंत डॉ. बाजपेयी यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
या प्रकरणाचा तपास सुरू असताना डिसेंबर महिन्यातही एका बाळाची विक्री झाल्याचे उघड झाले होते. त्या दृष्टीने ही पोलिसांचा तपास सुरू होता. चेंबर महिन्यात झालेल्या बाळ विक्री प्रकरणात मध्यस्थी असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. दरम्यान 21 फेब्रुवारी रोजी रात्री महिला बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती पोलिसांनी डिसेंबर महिन्यात विक्री झालेले हे बाळ ताब्यात घेतले. मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथून बाळ हस्तगत करण्यात आले. बाळ विकत घेणारे मूळ मोहाडी तालुक्यातीलच मोहदूरा येथील असून विक्री प्रकरण गाजू लागल्याने भीती पोटी ते नातेवाईकांच्या घरी जाऊन वास्तव्यास होते, असे सांगितले जाते. नातेवाईकांकडे असतानाच हे बाळ ताब्यात घेण्यात आले. जवळपास दोन महिने वयाचे ते असल्याचे समजते. चार लाख 70 हजार रुपये हे बाळ विकण्यात आले होते. चार लाख रुपये नगदी, पन्नास हजार रुपये डॉक्टरांच्या खात्यावर ऑनलाईन अशा पद्धतीने हा व्यवहार झाला होता अशी माहिती आहे.
 
 
पोलिसांनी ताब्यात घेतलेले बाळ सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले असून या प्रकरणाच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे. बाळ ताब्यात घेतल्याच्या बातमीला शिवम विसापूरे यांनी दुजोरा दिला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले.
Powered By Sangraha 9.0