बजाज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची आणखी एक मोठी उपलब्धी

22 Feb 2026 17:05:04
वर्धा,
Bajaj Science Junior College, शिक्षा मंडळ द्वारा संचालित येथील बजाज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. राज्य शासनाच्या एसयूएएफएफ (शाळा गुणवत्ता आश्वासन आणि प्रमाणीकरण आराखडा) अंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात या महाविद्यालयाला प्रतिष्ठित ‘अ +’ ग्रेड देऊन गौरवण्यात आले आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, शिस्तबद्ध प्रशासन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या त्रिसुत्रीच्या जोरावर महाविद्यालयाने हे यश संपादन केले आहे.
 

Bajaj Science Junior College, 
राज्य शासनाच्या एसयूएएफएफ समितीने महाविद्यालयातील विविध निकषांची सखोल तपासणी केली. यात प्रामुख्याने अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, भौतिक पायाभूत सुविधा, विद्यार्थी साहाय्यता प्रणाली आणि सहशालेय उपक्रम, प्रशासकीय कामकाज आणि पारदर्शकता, या सर्व मानकांवर महाविद्यालय उत्तम ठरल्याने समितीने महाविद्यालयाला सर्वोच्च श्रेणी बहाल केली आहे.
महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल आनंद व्यत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप टेकाडे म्हणाले की, हा विजय म्हणजे संपूर्ण संस्थेच्या सामूहिक कष्टाचे फळ आहे. शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने दर्जा सुधारण्यावर भर दिला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळेच हे यश शय झाले असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य संजय नाखले, एसयूएएफएफ समितीचे समन्वयक गणेश घाटोळे यांनीही या यशाबद्दल सर्व घटकांचे आभार मानले. सभापती संजय भार्गव यांनी महाविद्यालयाच्या या गौरवशाली कामगिरीचे कौतुक करत आगामी काळात शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्याचा विश्वास व्यत केला आहे. बजाज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे या महाविद्यालयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, ज्यावर आता ‘अ +’ ग्रेडने शिकामोर्तब झाले आहे
Powered By Sangraha 9.0