"भारतामुळे ब्राझील कर्जदार बनला," राष्ट्रपती लुला यांनी सांगितली कहाणी

22 Feb 2026 12:26:00
नवी दिल्ली,   
brazilian-president-in-india ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा भारताच्या दौऱ्यावर असून रविवारी त्यांनी भारत-ब्राझील संबंधांबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. भारताशी असलेले संबंध केवळ राजनैतिक मर्यादेत नसून ते वैयक्तिक आणि भावनिक पातळीवरही घट्ट जोडलेले असल्याचे त्यांनी सांगितले. या नात्यामुळे ब्राझीलला अनेक बाबतीत प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
brazilian-president-in-india
 
आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील व्यापक परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून हा दौरा आखण्यात आल्याचे सांगताना त्यांनी जागतिक स्तरावर ब्राझीलची प्रतिमा आणि वाटाघाटी क्षमता पुन्हा मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. गेल्या तीन वर्षे आणि दोन महिन्यांत ब्राझीलने आपल्या उत्पादनांसाठी ५२० नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या केल्याचे त्यांनी सांगितले आणि हे अपेक्षेपेक्षा अधिक मोठे यश असल्याचे नमूद केले. २००५ मधील भारत भेटीची आठवण करून देताना त्यांनी त्या वेळी भारताच्या परकीय चलन साठ्याने त्यांना प्रभावित केले होते, असे सांगितले. brazilian-president-in-india त्यानंतर ब्राझीलनेही मजबूत परकीय चलन साठा उभारण्याचा निर्णय घेतला आणि पुढे ३६० अब्ज डॉलर्सपर्यंत साठा वाढवण्यात यश मिळवले. परिणामी, आयएमएफकडून कर्ज घेणाऱ्या देशाच्या भूमिकेतून बाहेर पडत ब्राझील जागतिक स्तरावर महत्त्वाचा कर्जदाता देश बनला, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताशी वाढत्या सहकार्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की दोन्ही देशांमधील व्यापार २.४ अब्ज डॉलर्सवरून १०.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. २०३० पर्यंत हा आकडा २० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांची आर्थिक क्षमता लक्षात घेता व्यापार ३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरोग्य क्षेत्रात सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती देत त्यांनी या सहकार्याला विशेष महत्त्व दिले. brazilian-president-in-india नरेंद्र मोदी यांच्या ब्राझील दौऱ्याची आठवण सांगताना त्यांनी एक खास प्रसंगही शेअर केला. साओ पाउलो येथे मोदींच्या आवडत्या गाण्यावर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पलासिओ दा अल्व्होराडा येथे ठेवलेल्या या सरप्राईजने ते प्रभावित झाले होते, असे लुला यांनी सांगितले. दिल्लीतील भोजनावेळी ब्राझिलियन संगीतकारांच्या, विशेषतः ‘आसा ब्रांका’ या प्रसिद्ध गीताच्या सुरांनी त्यांना दिलेला आनंदही त्यांनी व्यक्त केला. भारत आणि ब्राझील यांच्यातील धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेण्याची ही भेट ठरेल, असा विश्वास लुला यांनी व्यक्त केला.
 
Powered By Sangraha 9.0