रमजानमध्ये सवलत द्या; अबू आझमी यांची फडणवीस यांच्याकडे मागणी

22 Feb 2026 12:41:37
मुंबई,  
abu-azmis-demand-to-fadnavis रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी महाराष्ट्र सरकारकडे काही विशेष सवलती देण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून रोजा पाळणाऱ्या आणि नमाज अदा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी चार वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज करून त्यानंतर सुट्टी देण्याचा विचार करावा, अशी विनंती केली आहे. इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्या जात असल्याचे नमूद करत महाराष्ट्रातही तशाच निर्णयाचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे रमजान काळात सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांना सवलत दिली गेल्याची उदाहरणे त्यांनी दिली.
 
abu-azmis-demand-to-fadnavis
 
आझमी यांनी सांगितले की रमजान हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ आहे, त्यामुळे रोजा करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळावा हीच अपेक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काही प्रमाणात सवलत देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. abu-azmis-demand-to-fadnavis दरम्यान, ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाच्या टीझरवरून सुरू झालेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते अशा प्रकारच्या कथानकांमुळे समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. विविध धर्मांतील युवक-युवती परस्पर संमतीने विवाह करत असल्याचे सांगत त्यांनी द्वेष वाढवणाऱ्या आशयापेक्षा समाजात सकारात्मक संदेश देणारे चित्रपट निर्माण व्हावेत, असे मत व्यक्त केले. कोणीही कायद्याचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, परंतु समाजात सौहार्द टिकवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Powered By Sangraha 9.0