हावरापेठ येथे साई पालखीचे भव्य स्वागत

22 Feb 2026 13:31:23
नागपूर,
Hawrapeth श्री रामनवमी उत्स निमित्त श्री शिर्डी साई द्वारकामाई पदयात्रा सेवा समिती नागपूर द्वारा आयोजित नागपूर ते शिर्डी श्री साई बाबा पालखी पदयात्रेस आज दिनांक २२ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाले.२७ मार्च ला शिर्डी येथील साई मंदिरला पोहोचेल. आज २२ फेब्रुवारी ला पहाटे आयोध्यानगर येथील साई मंदिर मध्ये पूजाअर्चाना करून साई पालखी पदयात्रेस सुरवात झाली.पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात साई भक्त सहभागी झालेत.

Hawrapeth
 
साई पालखीचे आगमन हावरापेठ हनुमान मंदिर प्रवेश द्वाराजवळ येताच हावरापेठ मित्र परिवारांच्या वतीने साई पालखीला माल्याअर्पण व पायदळ वारीतील भक्तांचे पुष्पवृष्टीचा वर्षाव करुन भव्य स्वागत करण्यात आले.मंगेश हातागडे,पंकज हातागडे यांच्या वतीने भक्तांना अल्पोपहार व बिसलेरी पाणी बाॅटल वाटप करण्यात आले. तर मोरे परिवार यांच्या वतीने शरबत,पार्ले बिस्किट पाकीट,चाकलेटचे वाटत करण्यात आले. Hawrapeth  यावेळी साई भक्त मंगेश हातागडे, दिनेश बांगडे, पंकज हातागडे, राकेश मोरे, बबलु वरठी, गोलू बांगडे, नारायण गायकवाड, राजू इटनकर, रुपेश मोरे, किरण जोशी, रजनी मोरे इत्यादी बरेच मित्र परिवार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0