हिंगणघाट आगाराला मिळाल्या चार नवीन बसेस

22 Feb 2026 20:35:26
*आजनसरा-नागपूर बससेवेचाही शुभारंभ
 
हिंगणघाट, 
Hinganghat: New buses हिंगणघाट आगाराला नवीन चार बसेस प्राप्त झाल्या असून त्या बसेसचे लोकार्पण आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र आजनसरा ते नागपूर नियमित बससेवा सुरू करावी, असे आवाहन यावेळी आ. समीर कुणावार यांनी आगार प्रशासनाला केली. आ. कुणावार यांच्या आवाहनाला एसटी प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद देत एक बस भाविकांसोबत हिरवी झेंडा दाखवत नियमित सेवेसाठी नागपूरच्या दिशेने रवाना केली.
 
 
busdksal
 
Hinganghat: New buses  आजनसरा येथे विदर्भातून भाविक दर्शनाला येत असल्याने भाविकांना आता दर्शनासाठी सोयीस्कर आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यावेळी एसटी महामंडळाच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नप बांधकाम सभापती चंद्रकांत मावळे, नगरसेवक सोनू गवळी, नगरसेवक अतुल नंदागवळी, नगरसेवक रोहीत हांडे, देवा पडोळे, डॉ. विजय पर्बत, विभागीय आगार व्यवस्थापक स्वाती तांबे, आगार व्यवस्थापक गौतम शेंडे व सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0