नवीन ग्रापं भवनामुळे ग्रामविकासाच्या प्रक्रियेला बळ : आ. बकाने

22 Feb 2026 19:46:51
*सेवाग्राम येथे नवीन ग्रापं भवनाचे लोकार्पण
 
देवळी, 
Inauguration of the Grama Bhavan सेवाग्राम ही केवळ ऐतिहासिक गाव नसून विकासाच्या दृष्टीनेही आदर्श ठरणारी ग्रामभूमी आहे. ग्रामपंचायत हे गावाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्रस्थान असते. नव्या ग्रामपंचायत भवनामुळे प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होईल. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुसज्ज वातावरणात उपलब्ध होतील. त्यामुळे ग्रामविकासाच्या प्रक्रियेला नवे बळ मिळेल, असे प्रतिपादन आ. राजेश बकाने यांनी केले. सेवाग्राम येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा सेवाग्राम मंडळाचे अध्यक्ष गौरव गावंडे, नंदकिशोर झोटिंग, माजी सरपंच सुचिता ताकसांडे, दीपाली नागतोडे, संदीप मुडे, मधुकर केवतकर, विनोद नागतोडे, प्रशासक गावंडे, ग्राम विकास अधिकारी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
bakane
 
Inauguration of the Grama Bhavan  आ. बकाने पुढे म्हणाले, देवळी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सेवाग्राममधील हे नवीन भवन हे त्या विकासदृष्टीचे प्रतीक आहे. गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकास कामांनाही प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामपंचायत भवन उभारणीसाठी आ. राजेश बकाने यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. नवीन ग्रामपंचायत भवनाच्या लोकार्पणामुळे सेवाग्रामच्या विकासाला नवे पर्व प्राप्त झाले असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यत केला. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0