तेहरान,
iran-declares-european-union-terrorist इराणने युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या नौदल आणि वायुदलाला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २०१९ मध्ये युरोपियन युनियनने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिउत्तरात्मक कारवाई करण्यात आल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाच्या निवेदनात युरोपियन युनियनची आयआरजीसीविरोधातील भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांविरोधात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने २०१९ मध्ये आयआरजीसीला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर इराणने पारस्परिक कारवाईसंदर्भातील कायद्यातील तरतुदींनुसार निर्णय घेतला आहे. iran-declares-european-union-terrorist अमेरिकेच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या किंवा त्याचे अनुकरण करणाऱ्या देशांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
युरोपियन युनियनने आयआरजीसीला दहशतवादी संघटना ठरवल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे. या निर्णयामुळे आयआरजीसीला इस्लामिक स्टेट आणि अल कायदा यांच्यासारख्या संघटनांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. iran-declares-european-union-terrorist १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर शिया धार्मिक व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयआरजीसीचा इराणच्या अर्थव्यवस्था आणि सशस्त्र दलांवर मोठा प्रभाव आहे. तसेच देशाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रमांवरही या दलाची देखरेख असते.
दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांकडून इराणवर युरेनियम संवर्धन कार्यक्रम थांबवण्यासाठी दबाव कायम ठेवण्यात येत आहे. इराण अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका व्यक्त करत या देशांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत १० ते १५ दिवसांच्या आत अणु कराराबाबत अमेरिकेसोबत समझोता न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले आहे.