सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

22 Feb 2026 20:46:05
तभा वृत्तसेवा
मुंबई,

budget session 2026  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 23 फेब्रुवारीपासून होत असताना, पूर्वसंध्येला आयोजित पारंपरिक चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. पत्रकार परिषद घेत विरोधकांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. भ्रष्टाचार, शेतकèयांची बिकट स्थिती, वीजदरवाढ, ड्रग्ज प्रकरणे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतच्या संशयास्पद परिस्थितीवरून यावेळी हल्ला चढविण्यात आला.
 
 

fsr 
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेला कॉग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, उबाठा नेते भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची अनुपस्थिती दिसली.
 
 

संविधानाचा आदर नाही, म्हणून बहिष्कार- भास्कर जाधव
सत्ताधाèयांचे वर्तन संविधानाचा आदर करणारे नाही. त्यामुळे चहापानाला उपस्थित राहणे योग्य वाटत नाही. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. हा अपघात की घातपात, याबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. असे उबाठा नेते भास्कर जाधव यावेळी म्हणाले. जाधव यांनी शेतकरी आत्महत्या, पीकविमा न मिळणे, ‘लाडकी बहीण’ योजनेबाबतची विसंगती, मंत्रालयातील कथित ‘लक्ष्मीदर्शन’, मंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या एसीबी कारवाया, तसेच ड्रग्ज कारखान्यांवरील कारवाईतील कथित ढिलाई यांचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. एका बाजूला विरोधकांना चहा पाजायचा आणि दुसèया बाजूला राज्यातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात ढकलायचे, हा विरोधाभास आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
 
 
घोषणांचा पाऊस, प्रत्यक्षात फसवणूक- विजय वडेट्टीवार
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या घोषणेच्या आधारावर सत्ता मिळवली. मात्र शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक या मुद्यांवर सरकार अपयशी ठरले. असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.एमएसपीने खरेदी न होणे, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकèयांचे नुकसान, मराठवाड्यातील वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टीसाठी केंद्राकडून निधी न मिळणे, शेतकरी सावकारांच्या विळख्यात अडकला आहे, किडनी विकण्याची वेळ येते, हे राज्यासाठी लाजिरवाणे आहे, असे ते म्हणाले.वडेट्टीवार यांनी डावोस करारांबाबत श्वेपत्रिका काढण्याची मागणी केली. 30 लाख कोटींचे करार झाले म्हणता, तर महिलांना 1500 ऐवजी 3000 रुपये का देत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात 20 ते 25 टक्के कमिशनखोरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
 
भीतीपोटी विरोधी पक्षनेतेपद देत नाहीत
मुलुंडमधील एलबीएस रोडवरील दुर्घटनेचा उल्लेख करत, पायाभूत कामांतील निष्काळजीपणावर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मृतांच्या जीवाची केवळ पाच लाखांची किंमत लावल्याचा आरोप केला. राज्यातील शेतकरी आत्महत्या, पीकविमा न मिळणे आणि आर्थिक घसरण यावरून सरकारला लक्ष्य करताना त्यांनी सरकारमध्येच ‘इन्फ्रा मॅन’ पदासाठी श्रेयवादाची रस्सीखेच सुरू असल्याचा दावा केला. तसेच बहुमत असूनही विरोधी पक्षनेतेपद न देण्याबाबत भाजपा भीतीपोटी निर्णय घेत, नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0