पुणे
Harshvardhan Sapkal, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणात राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे एकच उमेदवार निवडून जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे एक उमेदवार निवडून गेले होते, परंतु सध्याच्या विधिमंडळाच्या संख्याबळावरून आता महाविकास आघाडी एकत्र येऊन एकच उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची आणि काँग्रेसला राज्यसभेवर संधी देण्याची भूमिका घेतली. "माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी राज्यसभेवर काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे," अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी सत्ताधारी भाजपवर तीव्र शब्दात टीका करत सांगितले की, भाजप प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालतो आणि लोकशाहीला तिलांजली देतो. यामुळे जनतेचे प्रश्न मागे पडतात. "सत्ताधारी पक्षाच्या या अराजकतेमुळे राज्यातील घोटाळ्यांवर कोणतेही ठोस उत्तर देण्यात येत नाही. यावर श्वेतपत्रिका काढावी," अशी मागणी सपकाळ यांनी केली.
महाविकास आघाडीच्या Harshvardhan Sapkal, बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार का गैरहजर होते, याबद्दल ते चांगलेच गडबडले होते. "परंतु, प्रत्यक्ष विधिमंडळात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार," असा इशाराही त्यांनी दिला.सत्ताधारी भाजपचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्या वर्तमनात असलेल्या हिंसक घटनांवरही सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. "काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काँग्रेस भवनवर हल्ला केला, तो घृणास्पद आहे. त्या दिवशी पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था का दिली नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.साथच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका आणि कापूस उत्पादकांना होणाऱ्या फटका बाबत सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली. "या व्यापार करारामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही राज्यभर पदयात्रा काढणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.संपूर्ण पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीवर जोर दिला आणि भाजपच्या धोरणांवर असंतोष व्यक्त केला. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे आगामी राजकीय घडामोडींची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.