माझी वसुंधरा ५.० राज्यस्तरीय पुरस्कार देवळी नप प्रदान

22 Feb 2026 20:20:04
देवळी,
Mazi Vasundhara 5.0, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयांतर्गत माझी वसुंधरा २०२४-२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागात देवळी नपला दोन पुरस्कार जाहीर झाले होते. २१ रोजी मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल इंडोअर स्टेडियम येथे शानदार पुरस्कार वितरण समारोहात १ कोटी ७५ लाख रुपयांचे दोन पुरस्कार नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, मुख्याधिकारी नेहा आकोडे, यांनी स्वीकारला.
 

 Mazi Vasundhara 5.0, 
शहरात पर्यवारण संरक्षण व संवर्धन तसेच पर्यावरणीय बाबींचा विचार करून राबविलेल्या विशेष प्रयत्नांमुळे देवळी नगरपरिषदेला सर्वाधिक गुण प्राप्त झाले. शनिवारी मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल इंडोअर स्टेडियम येथे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा मुख्याधिकारी नेहा आकोडे यांनी पुरस्कार स्वीकाराला. यावेळी उपनगराध्यक्ष राहुल चोपडा यांनी नप मुख्याधिकारी व सर्व विभागातील कर्मचार्‍यांचे अभिनंदन करीत हा पुरस्कार प्रशासकीय काळाचा असून २०२४-२५ मध्ये लोकनियुत पदाधिकारी नसताना सर्व कर्मचार्‍यांनी एकजुटीने व निष्ठेने या स्पर्धेत काम केल्याने या पुरस्काराचे श्रेय सर्व कर्मचार्‍यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर परिषदेच्या या यशाबाबत आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांनी मुख्याधिकारी नेहा आकोडे व नपच्या सर्व विभागाच्या कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0