मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील प्रवाशांसाठी गुड न्यूज! सरकारने घेतला मोठा निर्णय

22 Feb 2026 20:14:16
मुंबई
Mumbai Pune Expressway, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीमुळे तब्बल ३२ तास गडबड झाली होती, ज्यामुळे सुमारे १.२ लाख प्रवासी अडकले होते. या भीषण कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने अडकलेल्या वाहनचालकांना ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याची घोषणा केली आहे.
 

 Mumbai Pune Expressway, traffic jam, 
३ फेब्रुवारीला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहनांची रांग ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पसरली होती. गॅस गळतीच्या प्रकरणामुळे मुंबईकडे जाणारी लेन बंद करावी लागली होती, ज्यामुळे पुणे लेनवरही खालापूर टोल प्लाझापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. या कोंडीमुळे हजारो वाहनधारक अडकले होते, आणि त्यांना मोठ्या प्रमाणात असुविधा होऊ लागली होती.या अपघातामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगम (MSRDC) ने टोल परताव्याची घोषणा केली. ही रक्कम थेट वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये जमा केली जाईल. ३ फेब्रुवारीला टोल आकारला गेलेले सर्व वाहन आणि त्याच्या फास्टटॅगद्वारे कापले गेलेले पैसे तपासून, ते संबंधित वाहनधारकांच्या खात्यात परत करण्यात येणार आहेत.टोल परतावा केवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरीलच नाही, तर पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलदेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. FASTag प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने कापले गेलेले टोलच्या व्यवहाराची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर परतफेडीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात या संपूर्ण रकमेचे परतफेडीचे कार्य पूर्ण होईल.या निर्णयामुळे ३२ तासांपर्यंत अडकलेल्या वाहनधारकांसाठी सरकारने दिलासा देण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना आवश्यक ती आर्थिक मदत मिळेल, आणि भविष्यातील कोंडीच्या परिस्थितीला समोर जाऊन अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Powered By Sangraha 9.0