समता फाउंडेशनला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार

22 Feb 2026 18:36:45
रिसोड,
Samata Foundation महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाव्दारे राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने समता पुरुषोत्तम अग्रवाल मेमोरियल फाउंडेशनचा गौरव करण्यात आला.
 

Samata Foundation
हा पुरस्कार सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे विश्वस्त रवी अग्रवाल व रिचा अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय, मुंबई येथे पार पडलेल्या या समारंभात राज्यभरातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने राबविण्यात येणार्‍या आरोग्यविषयक उपक्रमांची दखल घेऊन फाउंडेशनची राज्यस्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यात आली होती. या यशाबद्दल विविध स्तरांतून समता फाउंडेशन टीमचेअभिनंदन होत आहे.
छायाचित्र - पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर
Powered By Sangraha 9.0