न्यायालयाच्या निकालानंतरही ट्रम्प आक्रमक; जागतिक करदरात मोठी वाढ

22 Feb 2026 10:22:45
वॉशिंग्टन,  
trump-increase-in-global-tax-rates अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाकडे दुर्लक्ष करत जागतिक आयातीवरील शुल्कात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लावलेले व्यापक शुल्क असंवैधानिक ठरवत रद्द केले होते. मात्र त्यानंतर अवघ्या एका दिवसात ट्रम्प यांनी आपली भूमिका अधिक कठोर करत नवीन निर्णय जाहीर केला.
 
trump-increase-in-global-tax-rates
 
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत सांगितले की, तत्काळ प्रभावाने जगातील सर्व देशांकडून होणाऱ्या आयातीवरील शुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येत आहे. अनेक देशांनी दशकानुदशके अमेरिकेचा फायदा घेतला असून आता त्याला आळा घालण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले. पुढील काही महिन्यांत कायदेशीर चौकटीत राहून आणखी नवे कर लागू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. trump-increase-in-global-tax-rates हा निर्णय १९७४ च्या ट्रेड ऍक्टमधील कलम १२२ अंतर्गत घेण्यात आला आहे. या तरतुदीनुसार, व्यापार तुटीच्या परिस्थितीत राष्ट्राध्यक्षांना १५० दिवसांपर्यंत कमाल १५ टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार आहे. यापूर्वी शुक्रवारीच १० टक्क्यांचे तात्पुरते जागतिक शुल्क लागू करण्यात आले होते. आता १५ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने हे शुल्क कायद्यानुसार असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचले आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. trump-increase-in-global-tax-rates अमेरिकेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शुल्क धोरण आवश्यक असल्याचा त्यांचा पुनरुच्चार असून, ‘अमेरिका फर्स्ट’ या भूमिकेवर ते ठाम असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0