- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- दीनदयाल शोध संस्थानचा कार्यकर्ता दिन उत्साहात
नागपूर
सुमतीताई सुकळीकर यांच्यासह अनेकांनी समर्पण भावनेने मौलिक सामाजिक कार्य केले आहे. अशा सर्व कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री Union Minister Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. लक्ष्मीनगर येथील दीनदयाल शोध संस्थान, बालजगत येथे लोकमाता सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यकर्ता दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे, बालजगतच्या मार्गदर्शिका निवृत्त न्या. मीराताई खडक्कार, उपाध्यक्ष पंकज महाजन, प्रकल्प संयोजिका अनुजा परचुरे, दीनदयाल शोध राष्ट्रीय सचिव निखिल मुंडले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्विमिंग पूलमध्ये क्लोरिनचा वापर टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या ओझोन जनरेटरचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बालजगतचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश सुकळीकर, निवृत्त प्राचार्य लक्ष्मणराव (प्रभुजी) देशपांडे, बालजगत वाचनालयाच्या राहिलेल्या जयश्री मास्टे आणि स्वच्छंद प्रकल्पाच्या कार्यकर्त्या सोनाली जिंतुरकर यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
त्याग, निष्ठा आणि परिश्रमांमुळेच मोठे यश
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गडकरी पुढे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमांमुळेच आज भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. संस्था किंवा सामाजिक संघटनेसाठी अखंड समर्पण भावनेने केलेले प्रत्येक कार्य मोलाचे आहे. पूर्वी जनता पार्टीच्या शासन कार्यकाळात निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक व्हायची. सायकल रिक्षातून प्रचार करीत असताना अपमान सहण करावा लागत होता. मात्र आता अनेक ठिकाणी सत्कार केल्या जातो. चांगल्या कार्याचे फळ भविष्यात निश्चितच मिळते, असा विश्वास Union Minister Nitin Gadkari गडकरी यांनी व्यक्त केला.
प्रकल्प ५० पटीने वाढावेत
बालजगतकरिता अनेकांनी योगदान दिले आहे. नव्या पिढीने हा प्रकल्प अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. आगामी काळात बालजगतचे प्रकल्प ५० पटीने वाढावेत. चांगल्या सामाजिक कार्यासाठी मदत करणारे अनेकजण समोर येतात. सुमतीताई सुकळीकर यांच्या कार्याची आठवण कायम राखत बालजगतचे कार्य वटवृक्षाप्रमाणे मोठे व्हावे. एकंदरीत सामाजिक कार्याचे भान केलेले राजकारण म्हणजे राष्ट्रकार्य होय, असे प्रतिपादन Union Minister Nitin Gadkari गडकरी यांनी केले.
शाळा, खेळाचे वर्ग सुरू होणार
अभिनंदन पळसापुरे म्हणाले, बालजगतच्या उभारणीतील सुमतीताई यांचे योगदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे. बालक आणि आजी आजोबांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बालजगतचे उपक्रम वर्षभर सुरू असतात. आगामी काळात शाळा, खेळाचे वर्ग सुरू येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंत्योदय प्रकल्पाच्या बालिकांनी नितीन गडकरी यांचे औक्षण केले. बालिकांनी गजानना गणराया या गीतावर नृत्य सादर केले.