वैदर्भीय कन्या वैशाली राऊत यांची राज्य प्रबंधकपदी नियुती

22 Feb 2026 16:38:01
वर्धा,
Vaishali Raut Maharashtra Nursing Board, राज्यातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणार्‍या महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक पदी वैदर्भीय कन्या असलेल्या वैशाली प्रवीण राऊत यांची राज्य सरकारने नियुती केली आहे. राज्यसरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सदर स्वायत्त संस्थेच्या पहिल्या पूर्णवेळ प्रबंधक पदी विराजमान होण्याचा बहुमान वैदर्भीय कन्येला प्राप्त झाला आहे.
 

 Vaishali Raut Maharashtra Nursing Board, 
वैशाली राऊत यांचा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुयातील वासी येथे जन्म झाला असून देवळी तालुयातील अंदोरी येथील त्या स्नुषा आहे. यांचे नागपूर येथील माधुरीताई देशमुख नर्सिंग विद्यालयातून जीएनएम पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथील तेरणा नर्सिंग महाविद्यालयातून एमएससी नर्सिंग पदवी संपादन केली. अकोला, नागपूर आणि मुंबईतील शासकीय रुग्णालयांत अधिपरिचारिका म्हणून काम करताना त्यांनी प्रशासकीय कौशल्य आणि शैक्षणिक दृष्टी दोन्ही विकसित केले. प्रतिनियुतीवर पाठ्यनिर्देशिका म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच आपल्या अनुभवाच्या जोरावर मंडळाच्या सहप्रबंधक म्हणून प्रतिनियुतीने कार्यरत असताना व प्रबंधक पदाचा अतिरित कार्यभारही समर्थपणे सांभाळत विविध कठोर निर्णय घेतले. या कालावधीत त्यांनी नर्सिंग पदविका शिक्षणाची नवीन नियमावली, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक केली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत गैरप्रकार करणार्‍या संस्थांवर कडक कारवाई केली. त्यांच्या कठोर पण सकारात्मक निर्णयांची दखल मुंबई उच्च न्यायालयानेही गैरकृत्य करणार्‍या संस्थांवर कारवाईचा मंडळाचा निर्णय योग्य ठरविला. म्हणून सोलापूर येथील सामाजिक संस्थेकडून त्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
राज्यात १२०० पेक्षा अधिक विद्यालयातून १ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे सदर व्यापक यंत्रणेची जबाबदारी वैशाली राऊत यांचेवर दिली असून त्या मंडळाच्या पूर्णवेळ प्रबंधक म्हणून कार्यरत राहणार आहे. ग्रामीण विदर्भातून राज्यस्तरावर झेप घेतलेल्या वैशाली राऊत यांची ही नियुती केवळ वैयतिक यश नसून नर्सिंग क्षेत्रातील हजारो विद्यार्थिनींसाठी आणि अधिपरिचारिकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिपरिचारिका संवर्गातील प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र परिचर्या परिषद येथे शासन नियुत सदस्य म्हणून कार्यरत आहे.
Powered By Sangraha 9.0