नपचे रोजंदारी कर्मचारी तीन महिन्यांपासुन वेतना विना

22 Feb 2026 19:35:22
*आता सेवेत कायम करण्याची केली मागणी
वर्धा, 
Wardha Municipality नगरपालिकेत २० वर्षांपासून सफाई कामगार रोजंदारीने कामावर आहेत. तीन महिन्यांपासून त्यांचे वेतनसुद्धा झाले नाही. रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करून नियमित वेतन देण्यात यावे, अशी मागणी मुख्याधिकारी विजय देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
 
 
vetan
 
Wardha Municipality  नगर परिषदेत अनेक वषार्र्ंपासून रोजंदारीवर अनेक कर्मचारी काम करीत आहे. नगर परिषदेने यापूर्वी वार्ड ६ व १२, अंबिका चौक, महादेवपुरा, सोशालिस्ट चौक, शनी मंदिर देवस्थान, इतवारा बाजार, सरकारी दवाखाना, एस. टी. स्टॅण्ड, पोलिस स्टेशन परिसरात कामे कंत्राटी स्वरूपात त्यांच्याकडून करून घेतली आहे. मागील वर्षाचे कंत्राट हुसेन रा. चंद्रपूर यांनी घेतले होते. त्यांनी त्यांच्या कामावर जवळपास ३० कर्मचारी लावले. परंतु, या कंत्राटदाराने कंत्राटाचा कालावधी संपण्याच्या वेळेपर्यंत सफाई कामगारांचे ३ महिन्यापासूनचे वेतन प्रलंबित ठेवले. कंत्राटदाराचा कालावधी संपल्याबरोबर त्याने या कंत्राटी कामगारांचे वेतन न देता पोबारा केला. यावर्षीचे कंत्राट नवीन कंत्राटदार सुनील तडस यांना देण्यात आले. त्यांनी नवीन सफाई कामगारांची नियुती करणे सुरू केले आहे. त्यामुळे जुन्या गरीब सफाई कामगारांना त्यांच्या हकापासून वंचित राहावे लागत आहे. जुन्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करून व त्यांनी कंत्राट घेतेवेळी जमा केलेली सुरक्षा रकम थांबवून कामगारांना त्यांचे वेतन अदा करावे. तसेच नवीन कंत्राटदार सुनील तडस यांना जुन्याच कामगारांना कामावर रुजू करण्याबाबतचे आदेश निर्गमित करावे. कंत्राटी कामगारांना २० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अशांना कायम नियुती देण्याबाबतचे आदेश असल्यामुळे सदर कामगारांना कायम सेवेत घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
Powered By Sangraha 9.0