घोगली शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

22 Feb 2026 13:04:40
नागपूर,
Zilla Parishad Primary School घोगली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगली (नवीन) येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. इयत्ता पहिली ते पाचवी तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बालमेळावा, बक्षीस वितरण आणि स्नेहभोजनाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले.स्नेहसंमेलनाची सुरुवात सरस्वती स्तवनाने झाली. स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, मुलाखत अशा विविध सांस्कृतिक सादर  प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
 

prati  
 
 
यावेळी स्वयंअध्ययन पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.दुसऱ्या दिवशी आयोजित बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून ‘खऱ्या कमाई’चा अनुभव घेतला. तिसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला नगरपंचायत उपसभापती मनीषा राजुरकर, राजेंद्र राजुरकर, मधुकर ठाकरे, राम सेवतकर, अनिल वारेकर, प्रतिभा वारेकर, कल्पना सेवतकर,Zilla Parishad Primary School सीमा ठाकरे, धनश्री सेवतकर, राजदीप राठोड, केंद्रप्रमुख रामकृष्ण ढोले, केदारे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कल्पना पटले यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वाडबुधे यांनी केले, तर संचलन व आभार प्रदर्शन सहा. शि. रामटेके यांनी केले.
सौजन्य: प्रतिभा वारेकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0