झाडा येथील जवान नक्षल्यांच्या हल्ल्यात गंभीर

23 Feb 2026 21:14:05
झारखंडमध्ये घडली घटना
 
धामणगाव रेल्वे, 
झारखंड राज्यातील साईबासाजवळील सारडा जंगलात attack by Naxalites नक्षल्यांसोबत गोळीबार सुरू असताना कोब्रा कमांडो दिनेश राऊत गंभीर जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना दिल्ली येथे हलविण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 

dinesh 
 
attack by Naxalites  दिनेश राऊत हे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा या गावातील रहिवासी असून सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. कोब्रा कमांडो दिनेश राऊत हे आपल्या देशसेवेत कार्यरत असताना झारखंड राज्यातील साईबासाजवळील सारडा जंगलात नक्षल्यांसोबत झालेल्या गोळीबारात गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दिनेश राऊत यांना अनेक गोळ्या लागल्या असून त्यांना तातडीने रांची येथील रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने पुढील उपचारासाठी त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारा दरम्यान दिनेश राऊत यांच्या शरीरात जहर पसरत चालले असल्याने त्यांचा डावा पाय कापण्यात आल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0