पंचसूत्री हीच हिंदूत्वाची गुरुकिल्ली : अतुल शेंडे

23 Feb 2026 20:06:02
हिंगणघाट, 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षाच्या विचारांच्या नवनीतातून स्वीकारलेल्या पंचसूत्री कार्यक्रमांचा समाज जीवनात व्यापक प्रचार व प्रसार केल्यास हिंदुत्व अधिक मजबूत होईल. त्यातून अवघ्या समाजाचे कल्याण होईल असे उद्बोधन विवेक विचार मंच विदर्भ प्रांत संयोजक समन्वयक Atul Shende अतुल शेंडे यांनी केले. श्रीराम चौक शास्त्री वार्ड येथे रविवार २२ रोजी आयोजित हिंदू संमेलनात प्रमुख वता म्हणून ते बोलत होते.  प्रमुख अतिथी अनिरुद्ध द्विवेदी महाराज, विहिंपच्या जिल्हा मातृशती संयोजक विद्या पेंडके उपस्थित होते.
 
 
hindku dsa
 
Atul Shende  शेंडे यांनी कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि स्वबोध यातूनच आपली प्रगती व एकात्मता साधणार असल्याचे प्रतिपादन केले. पारंपरिक आचार-विचार, सण-उत्सव आणि संयुत कुटुंब पद्धतीचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमापूर्वी शास्त्री वार्ड येथील हनुमान मंदिरातून दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाला नप उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नगरसेवक प्राची पाचखेडे, नितेश नवरखेडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनीता चिंचूकार, आदित्य गोयंका, गुड्डू मिश्रा, अरुण भोयर, विलास खडसे, श्याम दुधे, वसंत नव्हते, शंकर कापसे, संजू ओरा, प्रभाकर पाटील, किशोर शेंडे, संजू कुर्‍हाटकर, सुभाष महाजन, प्रभाकर शेंडे, प्रकाश लाखे, चंदू पंडित, खुशाल काळे, बाबाराव ढेकले, संतोष झोटिंग यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0