बदलापूरमध्ये ‘जिवंत देह’चा सौदा; ३३ वेळा प्रक्रिया करून महिलेचा जीव धोक्यात

23 Feb 2026 12:29:48
बदलापूर,  
badlapur-female-semen-sale-case महाराष्ट्रातील बदलापूर परिसरात उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने मानवी संवेदनांना धक्का दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून अंडी काढून ते महागड्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्राथमिक चौकशीत सुमारे चाळीस महिलांचे शोषण झाल्याची माहिती समोर आली असून, एका पीडितेकडून तब्बल तेहतीस वेळा अंडी काढण्यात आल्याचा धक्कादायक तपशील उघड झाला आहे. नियमांनुसार एखाद्या महिलेला आयुष्यात केवळ एकदाच, तेही मोबदल्याविना, अंडाणू दान करण्याची परवानगी असताना या टोळीने कायद्याची पायमल्ली केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
badlapur-female-semen-sale-case
 
प्रकरणाची सुरुवात एका महिलेच्या तक्रारीपासून झाली. ठरलेली रक्कम न मिळाल्याची तिने स्थानिक आरोग्य केंद्रात तक्रार केली. तिची प्रकृती बिघडलेली पाहून डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि तपासाची दिशा बदलली. पुढील चौकशीत महिलांना कोणतीही योग्य वैद्यकीय सल्लामसलत न देता हार्मोन्स वाढविणारी इंजेक्शने देण्यात येत असल्याचे समोर आले. त्यानंतर अनधिकृतरीत्या तपासण्या करून वेगवेगळ्या प्रजनन उपचार केंद्रांमध्ये नेऊन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अंडी काढले जात होते. या साखळीतील मुख्य सूत्रधार म्हणून सुलक्षणा गाडेकर हिचे नाव पुढे आले आहे. badlapur-female-semen-sale-case तिच्या घरावर छापा टाकताना औषधांच्या इंजेक्शन्ससह अनेक कागदपत्रे आणि मोबाइलमधील छायाचित्रे जप्त करण्यात आली. त्यात औषधांचे फोटो, तपासणी प्रक्रियेचे चित्रण, महिलांची छायाचित्रे तसेच बनावट प्रतिज्ञापत्रांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अश्विनी चाबुस्कर आणि मंजूषा वानखेडे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्या दोघी आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना शोधून त्यांना पैशांचे आमिष दाखवत या प्रक्रियेसाठी तयार करत असल्याचा आरोप आहे.
तपास अधिक खोलवर जात असताना काही तपास केंद्रे, प्रजनन उपचार संस्था, औषध पुरवठादार आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांचीही संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. badlapur-female-semen-sale-case या प्रकरणाचा संबंध ठाणे जिल्ह्याशीही जोडला जात असून जाळे राज्यभर पसरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशीसाठी स्वतंत्र पथके तयार केली असून आणखी अटक होण्याची शक्यता नाकारलेली नाही. अधिकाऱ्यांच्या मते अशा बेकायदेशीर कारवायांमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे संपूर्ण साखळी उघड करून दोषींना कठोर शिक्षा देणे हीच सध्या प्रशासनाची प्राथमिकता आहे.
Powered By Sangraha 9.0