बुधवारपासून बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी

23 Feb 2026 21:06:49
अमरावतीला पहिल्यांदाच बहूमान
 
अमरावती, 
शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून विविध नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. जवळपास ६० वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून या स्पर्धा होत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच bal natya spardha बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावतीमध्ये २६ फेब्रुवारीपासून आयोजित होत असल्याची माहिती खा. अनिल बोंडे, काँग्रेस नेते विलास इंगोले, अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले, मनीष कहाते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
 

baldsl 
 
सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली bal natya spardha बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड आदी मान्यवरांच्या विशेष प्रयत्नामधून ही स्पर्धा अमरावती येथे होत आहे. मागील ५-६ वर्षांपासून अमरावती केंद्रावर बालनाट्य स्पर्धांचा विक्रम नोंदविल्या जात असून मागील वर्षी अमरावती केंद्रावर सादर झालेल्या ६० एकांकिकाचा विक्रम या वर्षी अमरावती केंद्रानेच मोडला असून ८९ बालनाट्यांच्या सहभागाचा नवीन विक्रम स्थापित झालेला आहे. स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले, नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे नियामक मंडळ सदस्य प्रशांत देशपांडे, नाट्य परिषदेचे पदाधिकारी व त्यांचे सहकारी या सर्वांच्या एकत्र प्रयत्नांतून या स्पर्धा एका उच्चस्तरावर पोहोचलेल्या आहेत.
 
 
यावर्षी bal natya spardha बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे बुधवार २६ फेब्रुवारीपासून सुरू होत असून या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेले उत्कृष्ट ४३ बालनाट्य सादर होणार आहेत. १२०४ बाल कलावंत आणि तंत्रज्ञ अमरावतीमध्ये आपली कला व कौशल्य सादर करणार आहेत. या स्पर्धेमधून उत्कृष्ट ठरलेल्या बाल नाट्यांना, कलावंतांना तसेच दिग्दर्शक इत्यादी तंत्रज्ञांना रोख पारितोषिक तसेच पदक आणि प्रशस्तीपत्र दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0