पुणे विमानतळाला बेस्ट एअरपोर्ट पुरस्कार

23 Feb 2026 21:33:21
उच्च दर्जाची सेवा प्रदान केल्याबद्दल सन्मान
 
पुणे , 
Best Airport Award to Pune Airport पुणे विमानतळाला विंग्स इंडिया २०२६ या प्रतिष्ठित नागरी विमान वाहतूक परिषदेत बेस्ट एअरपोर्ट १०-२५ एमपीपीए (दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष) हा मानाचा प्रदान करण्यात आला. २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान हैदराबाद येथे आयोजित या कार्यक्रमात मिळालेला हा सन्मान पुणे विमानतळाच्या कार्यक्षमतेच्या आणि प्रवासी सेवांच्या उन्नतीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
 
 
pune-airport
 
नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षम संचालन, मजबूत सुरक्षा मानके, प्रवासी सुविधा सुधारणा आणि उच्च दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी पुणे विमानतळाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही दखल आहे. मागील वर्षभरात पुणे विमानतळाने टर्मिनल संचालन सुलभ करणे, वेळेवर उड्डाणे, सुरक्षा पालन ग्राहक समाधान यात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. वाढत्या वाहतुकीनंतरही संचालनातील विश्वासार्हता आणि प्रवासी सुलभता राखण्यात विमानतळाने उच्च मानके कायम ठेवली असून १०-२५ एमपीपीए श्रेणीत देशातील आघाडीच्या विमानतळांपैकी एक म्हणून आपले स्थान बळकट केले आहे.
 
 
Best Airport Award to Pune Airport  या यशाबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विंग्स इंडिया २०२६ बेस्ट एअरपोर्ट १०-२५ एमपीपीए म्हणून पुणे विमानतळाचा गौरव झाल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान एएआय अधिकारी, विमान कंपन्या, सुरक्षा यंत्रणा आणि ग्राउंड हँडलिंग कर्मचारी अशा संपूर्ण विमानतळ समुदायाच्या समर्पण, व्यावसायिकता आणि संघभावनेचे द्योतक आहे.
पुणे होणार विमान वाहतुकीचे प्रवेशद्वार
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे विमानतळ मागण्या लक्षात घेऊन जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पायाभूत सुविधा व प्रवासी सुविधा सातत्याने उन्नत करत प्रादेशिक व राष्ट्रीय विमान वाहतूक विकासाला पाठबळ देण्यास कटिबद्ध आहे. वाढती कनेक्टिव्हिटी आणि प्रवासी संख्या लक्षात घेता, महाराष्ट्र व देशासाठी एक महत्त्वाचे विमान वाहतूक प्रवेशद्वार म्हणून पुणे विमानतळाची भूमिका अधिक होत आहे.
Powered By Sangraha 9.0