बेपत्ता भाजप नेते टी. रमणा कारमध्ये मृतावस्थेत सापडले

23 Feb 2026 15:47:39
जगतियाल,
BJP leader T. Ramana dies तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील सुद्दापल्ली येथील मल्याळा पूर परिसरात राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले भाजपचे नेते टी. रमणा एका कालव्यात पडलेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलीस आणि स्थानिकांची मदत घेऊन क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढली गेली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अपघात की घातपात, याबाबत तपास सुरू आहे.
 
 

telangana t ramana death 
मिळालेल्या माहितीनुसार, टी. रमणा हे या भागातील सक्रिय नेते होते आणि अलीकडेच त्यांनी बीआरएस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या बेपत्तेपणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती आणि पोलीस त्यांच्या शोधात होते. रविवारी स्थानिकांनी कालव्यात तरंगत असलेली कार पाहून तातडीने पोलीसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कार बाहेर काढली, त्यात टी. रमणा यांचा मृतदेह आढळला. पोलीसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, टी. रमणा यांची कार कालव्यात पडल्यामुळे मृत्यू झाला असावा, मात्र अपघात की घातपात याचा तपास सुरू आहे. नेत्याच्या अकस्मात मृत्यूनंतर तेलंगणातील राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला असून, स्थानिक राजकारणी आणि पक्षीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0