श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा धुलीवंदन महोत्सव ३ मार्चला

23 Feb 2026 13:57:42
नागपूर,
Gurudev Seva Mandal होळी-धुलीवंदन सण नागपूर शहरात उत्साहाने साजरा केला जातो. युवकांचा जल्लोष, रंगीबेरंगी उधळण आणि सणासंबंधी समाजातील सहभाग या सणाला विशेष उरकतात. होळी-धुलीवंदन हा सण वसंत ऋतुच्या आगमनाचे, कृषी संस्कृतीचे जतन करणारे आणि मानवी आरोग्यावर ऋतुचे परीणाम दर्शवणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून निसर्ग आणि आनंदाचा संदेश मांडला होता. त्यांच्या विचारधारेचा वारसा नागपूरातील श्रीगुरूदेव सेवाश्रम मध्ये भव्य प्रभातफेरीद्वारे पुढे नेला जात असे. निर्वाणानंतर, कर्मश्री दुर्गादास रक्षक यांनी हा वारसा श्रीगुरूदेव सेवा मंडळ, विश्वकर्मा नगर, नागपूर येथे चालू ठेवला आहे.
 
holi
 
यंदा श्रीगुरूदेव सेवा मंडळ, विश्वकर्मा नगर येथे ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता सामुदायिक ध्यानाने धुलीवंदन महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर प्रभातफेरी दोन-दोन रांगेत स्वच्छ कपडे परिधान करून एम्प्रेस मील कॉलनी, स्वराज कॉलनी आणि विश्वकर्मा नगर येथील मुख्य मार्गांवरून केली जाईल. या उपक्रमाने अनेक वर्षांपासून समाजात शिस्त, शांती आणि मानवतेचा संदेश दिला आहे. Gurudev Seva Mandal सर्व धर्म, पंथ आणि संप्रदायातील लोक रस्ते स्वच्छ करून, घरासमोर रांगोळ्या काढून आणि संत-महापुरुषांच्या प्रतिमा सजवून या सणात सहभागी होतात. प्रभातफेरी नंतर युवा-प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांच्या सप्तखंजरीतून प्रबोधन होईल. श्रीगुरूदेव सेवा मंडळ शाखा, विश्वकर्मा नगरचे नगरसेवाधीकारी ज्ञानेश्वर रक्षक यांनी सर्वांना या प्रबोधनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0