एप्रिल २०२६ पर्यंत द्विद्वाद योग; काही राशींसाठी कठीण काळ

23 Feb 2026 12:34:18
Dwidwad Yoga till April 2026 २३ फेब्रुवारीपासून मंगळ आणि शनि यांच्या स्थितीमुळे द्विद्वाद योग तयार झाला असून त्याचा प्रभाव २ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार आहे. या काळात मंगळ शनीच्या राशीत प्रवेश करत असून दोन्ही ग्रह एकमेकांच्या बाराव्या आणि दुसऱ्या स्थानात आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीमुळे काही राशींसाठी काळ आव्हानात्मक ठरू शकतो. विशेषतः तुळ, मकर आणि मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.
 
 
 
Dwidwadash Yog
 
तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचा असला तरी अपेक्षित फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो. शनि कठोर परिश्रम करवून घेईल, मात्र मंगळाच्या प्रभावामुळे कामात अडथळे जाणवू शकतात. विद्यार्थ्यांची एकाग्रता ढळू शकते तसेच चुकीच्या संगतीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांकडून त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे आवश्यक ठरेल. नकारात्मक वातावरणापासून दूर राहणे हितावह ठरेल. नियमित प्रार्थना आणि विशेषतः हनुमान स्तोत्राचे पठण मन:शांती देऊ शकते.
मकर राशीच्या व्यक्तींवर या योगाचा परिणाम मानसिक ताणाच्या रूपाने जाणवू शकतो. आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांशी किरकोळ कारणांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात. बोलण्यात संयम राखणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे ठरेल. आर्थिक बाबतीत अडचणी जाणवू शकतात व खर्चाचे नियोजन करणे आवश्यक ठरेल. या काळात संयम बाळगून भगवान शिवाची भक्ती केल्यास सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ परीक्षेचा मानला जात आहे. मानसिक अस्वस्थता, संभ्रम आणि ताण वाढू शकतो. स्पर्धात्मक क्षेत्रात अपेक्षित यश न मिळाल्यास निराशा जाणवू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना केल्यास मनोबल वाढण्यास मदत होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0