दादा, तुमचा निरोप घेण्याचा निर्णय चुकला… शिंदे विधानसभेत झाले भावूक

23 Feb 2026 15:34:30
मुंबई,  
shinde-became-emotional-in-assembly आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून, त्याच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिवंगत नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले की, “लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहेत, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या.”
 
 
shinde-became-emotional-in-assembly
 
या वेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने आणि नीला देसाई यांसारख्या दिवंगत सदस्यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली अजित पवारांच्या आठवणी उजाळून देताना शिंदे म्हणाले की, “मी, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा राज्याच्या स्थैर्याचा भक्कम ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून महाराष्ट्राची प्रगती वेगाने सुरू होती. २८ जानेवारीच्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा वेळ कधीच चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने घात केला. shinde-became-emotional-in-assembly टीव्हीवर अपघाताची दृश्ये पाहिली आणि मनाचा थरकाप उडाला.” त्यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, “प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदांतच त्यांनी कागदावरून चुका पटकन शोधून काढल्या. साध्या वायर किंवा पायऱ्या नीट न बसल्या तरी अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी दिली. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्या नावावर होता. बाहेरून कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला.”
शिंदे यांनी त्यांच्या मैत्रीतील किस्सेही सांगितले. हॉटेल हयातमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा असताना अजितदादांनी ठामपणे सांगितले की, “एकनाथराव असतील तर आम्हाला चालेल.” तसेच दादांनी रात्री उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा वडिलकीचा सल्ला दिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धीर देताना शिंदे म्हणाले की, “आभाळाएवढे दुःख असतानाही ताई खंबीरपणे उभी आहेस. आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. shinde-became-emotional-in-assembly विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही – ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने आणि नीला देसाई यांसारख्या दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
Powered By Sangraha 9.0